कोल्हार उपबाजारात गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल मंगळवार दि. 10 मे 2022 रोजी गव्हाची 6 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2170 रुपये तर जास्तीत जास्त 2200 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2180 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच सोयाबीन (डागी) ची 5 क्विंटल आवक झाली. सोयाबीन (डागी) ला सरासरी 5500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हरभर्‍याची 4 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4271 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.