कोल्हार उपबाजारात गहू 2055 तर हरभरा 4250 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2055 तर हरभरा 4250 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. 22 जून 2022 रोजी गव्हाची 15 क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2025 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 2055 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2040 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कोल्हार उपबजारात हरभर्‍याची 14 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला कमीत कमी 3920 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 4250 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4100 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com