कोल्हार उपबाजारात गहू 2300 तर हरभरा 4300 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2300 तर हरभरा 4300 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल सोमवार दि. 9 मे 2022 रोजी गव्हाची 18 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2 हजार रुपये तर जास्तीत जास्त 2300 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2200 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच हरभर्‍याची 11 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4300 रुपये इतका भाव मिळाला. मक्याची 8 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी प्रति क्विंटल 2200 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.