कोल्हार उपबाजारात गहू 2450 तर हरभरा 4350 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2450 तर हरभरा 4350 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. 27 एप्रिल 2022 रोजी गव्हाची 42 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 2450 रुपये तर कमीत कमी 1825 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2200 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच सोयाबीनची 15 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला जास्तीत जास्त 7 हजार 167 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी 7 हजार 31 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी 7 हजार 100 रुपये क्विंटल भाव मिळाला. हरभर्‍याची 11 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 4 हजार 350 रुपये तर कमीत कमी 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हरभर्‍याला सरासरी 4 हजार 325 रुपये क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.