कोल्हार उपबाजारात गहू 2175 तर सोयाबीन 6770 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2175 तर सोयाबीन 6770 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. 11 मे 2022 रोजी गव्हाची 25 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2000 रुपये तर जास्तीत जास्त 2175 रुपये इतका भाव मिळाला.

गव्हाला सरासरी 2100 रुपये क्विंटल भाव मिळाला. तसेच सोयाबीनची 8 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 6770 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हरभर्‍याची 1 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4300 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.