कोल्हार उपबाजारात सोयाबीन 5476 तर मका 2000

सोयाबीन
सोयाबीन

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात शनिवार दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सोयाबीनची 35 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 4900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 5476 रुपये भाव मिळाला. सरासरी 5400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तसेच मक्याची 1 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची 3 क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2645 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 2976 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com