कोल्हार उपबाजारात सोयाबीन 7150 तर गहू 2350 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात सोयाबीन 7150 तर गहू 2350 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल सोमवार दि. 25 एप्रिल 2022 रोजी सोयाबीनची 4 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रती क्विंटल सरासरी 7150 रुपये इतका भाव मिळाला.

कोल्हार बुद्रुक उपबाजारात काल गव्हाची 20 क्विंटल आवक झाली. गव्हाला जास्तीत जास्त 2350 रुपये तर कमीत कमी 2050 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. तसेच हरभरा (डंकी) ची 1 क्विंटल आवक झाली. डंकी हरभर्‍याला सरासरी 3400 रुपये इतका भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.