कोल्हार उपबाजारात सोयाबीन 6675 तर गहू 2230 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात सोयाबीन 6675 तर गहू 2230 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सोयाबीनची 10 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला जास्तीत जास्त 6675 रुपये प्रतिक्विंटल तर कमीत कमी 6600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 6650 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच कोल्हार उपबाजारात काल गव्हाची 25 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 2230 रुपये तर कमीत कमी 2000 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2125 रुपये क्विंटल भाव मिळाला.हरभर्‍याची 15 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 4300 रुपये तर कमीत कमी 4235 रुपये इतका भाव मिळाला.

हरभर्‍याला सरासरी 4275 रुपये क्विंटल भाव मिळाला. मक्याची 8 क्विंटल आवक झाली. मक्याला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 2205 रुपये तर कमीत कमी 2000 रुपये इतका भाव मिळाला. मक्याला सरासरी 2100 रुपये क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.