कोल्हार उपबाजारात सोयाबीन 7151 तर गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात सोयाबीन 7151 तर गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल गुरुवार दि. 28 एप्रिल 2022 रोजी सोयाबीनची 8 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 7 हजार 151 रुपये तर कमीत कमी 7 हजार 85 रुपये भाव मिळाला. सरासरी 7120 रुपये इतका भाव मिळाला.

कोल्हार बुद्रुक उपबाजारात काल गव्हाची 21 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल जास्तीत जास्त 2200 रुपये तर कमीत कमी 1800 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2050 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. तसेच हरभर्‍याची 1 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला प्रती क्विंटल सरासरी 4 हजार 386 रुपये इतका भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.