कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल, पुढे झाले असे काही...

कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल, पुढे झाले असे काही...

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोल्हार खुर्द (Kolhar) येथे पंढरपूरहुन नाशिककडे (Pandharpur to Nashik Bus) जाणार्‍या बसचे ब्रेक फेल (Brake Fail) झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस एक बांधकाम चालू असलेल्या वाळूच्या (Sand) ढिगावर घातल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.

कोल्हार खुर्द येथे नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) पंढरपूरहुन नाशिकच्या दिशेने जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक (एमएच 40क्यू 6373) हि प्रवाशांना घेऊन जात असताना कोल्हार खुर्द (Kolhar) जवळ या बसचा ब्रेक (Bus Brake Fail) फेल झाला. ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या (महादेव पांढरे, पंढरपूर डेपो) लक्षात आल्यानंतर त्याने बिरोबा मंदिराजवळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बस घातली. तेथे असलेल्या वाळूच्या ढिगावर गाडी जाऊन पुढे असलेल्या बांधकामावर गाडीची धडक बसून गाडी थांबली गेली.

कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल, पुढे झाले असे काही...
झेडपी कर्मचार्‍यानंतर प्राथमिक शिक्षकांसाठी भरती ?

रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. धडक बसल्यानंतर प्रवासी काहीवेळ घाबरले. यामध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही फक्त एक महिला किरकोळ जखमी झाली होती.

प्रवाशांचे दैव बलवत्तर व चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले कारण काही सेकंदावरच पुढे प्रवरा नदीचा (Pravara River) पूल होता जर या चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर गाडी प्रवरानदीकडे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चालकाच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक किलोमीटर मागेच ही बसचे ब्रेक फेल झाल्याचे या चालकाच्या लक्षात आल्यानंतर गाडी थांबवण्यासाठी तो जागा शोधत त्याने गाडी नियंत्रणात आणत समोर वाळूचा ढीग दिसल्यावर तेथे गाडी घातल्याचे संबंधित चालकाने सांगितले.

कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल, पुढे झाले असे काही...
दोन अल्पवयीन मुलींना धमकी देवून धर्मांतरासाठी दबाव व असभ्य वर्तन
कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल, पुढे झाले असे काही...
राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com