अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम

मे. डायमंड कन्स्ट्रक्शन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम चार टप्प्यांत होणार असून त्यावेळी वाहतूक श्रीरामपूर तसेच नेवासा फाटा मार्गे वळविण्यात येणार आहे.

पहिला टप्पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्पा 8 जानेवारी 2021 ते 9 जानेवारी 2021, तिसरा टप्पा 11 जानेवारी 2021 आणि चौथा टप्पा 13 जानेवारी 2021 या टप्पे ठरविण्यात आलेले आहे. पुलाच्या बांधकामाच्या वेळी चारही टप्प्यांमध्ये वाहतूक वळविण्यात येणार असून याबाबत कोणाच्या हरकती असल्यास 27 डिसेंबर 2020 पर्यंत द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

पुलाच्या बांधकामाच्यावेळी वरील चारही टप्प्यांमध्ये वाहतूक पुढीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे. अहमदनगरकडून संगमनेर, येवला, मनमाड, मालेगाव, धुळ्याकडे जाणारी जड वाहने ही नेवासा फाटा- कायगाव टोके फाटा-गंगापूर मार्गे जातील. इतर हलकी वाहने (चार चाकी व दुचाकी) ही नगर - राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर मार्गे जातील. शिर्डीकडून अहमदनगरकडे जाण्यासाठी सर्व वाहने कोल्हार, बेलापूर, राहुरी फॅक्टरी मार्गे जातील. श्रीरामपूर ते बाभळेश्वर ही एकेरी वाहतूक राहील तसेच कोल्हार ते बेलापूर ही देखील एकेरी वाहतूक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.