कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामसुधारक मंडळाच्या अनिता पाटील विजयी

कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामसुधारक मंडळाच्या अनिता पाटील विजयी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक पाटील व दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसुधारक मंडळाच्या अनिता दिगंबर पाटील या सरपंचपदी निवडून आल्या. त्यांनी नऊ सदस्यांसह बहुमत मिळविले असून विरोधी जनसेवा मंडळाला सहा जागा मिळाल्या.

कोल्हार खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत ना.विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांत निवडणूक होऊन त्यामध्ये दीपक पाटील व दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसुधारक मंडळाने सरपंच पदासह नऊ जागा जिंकून बहुमत मिळविले असून भाऊसाहेब लोंढे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा विकास मंडळाने सहा जागा जिंकल्या आहेत. विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे, सरपंच पदासाठी अनिता दिगंबर पाटील (1783 विजयी), कमल भाऊसाहेब लोंढे (1560 ), स्नेहल धनंजय शिरसाठ (146), स्नेहल श्रीधर शिरसाठ (286), ज्योती अण्णासाहेब धाकतोडे (165) तसेच प्रभाग क्रमांक 1 मधून संदीप कौशिराम बनकर (339), दिग्विजय अनिल शिरसाठ (553 विजयी), विमल रत्नाकर भोसले (583 विजयी), सुमन शांतवन भोसले (294), लता ज्ञानदेव घोगरे (221), शीतल प्रशांत शिरसाठ (302), सुवर्णा बापूसाहेब लोखंडे (366 विजयी), प्रभाग क्रमांक 2 मधून गोपीनाथ सावळेराम दळे (297 विजयी), प्रमोद बापूसाहेब मंडलिक (226), महिपती बाबुराव शिरसाठ (53), रामनाथ गंगाधर शिरसाठ (256), मंदा नानासाहेब चिखले (315), रुपाली संतोष पाटील (501 विजयी), प्रभाग क्रमांक 3 मधून दिलीप सखाहरी कानडे (449 विजयी), विजय देवराम कानडे (290), एकनाथ यादव कानडे (242) बापू गंगाधर टिळेकर (24), प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ (451 विजयी), चंद्रशेखर दत्तात्रय क्षीरसागर (22), स्वाती संदीप बनकर (427 विजयी), तेजस्वी रमण शिरसाठ (305) , प्रभाग क्रमांक 4 मधून किशोर पुंजा भोसले (91), भोसले प्रदीप अशोक (297), संदीप विजय भोसले (315 विजयी), स्वाती अनिल अनाप (326), भारती सदानंद शिरसाठ (366 विजयी), जयश्री कैलास भोसले (278), सविता दत्तात्रय लोंढे (409 विजयी) तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून दिगंबर भाऊसाहेब शिरसाठ (402 विजयी), भाऊसाहेब गंगाधर लोंढे (373), राजू कारभारी वर्पे (402 विजयी), सोमनाथ भाऊसाहेब शिरसाठ (321), ज्योती दीपक शिरसाठ (465 विजयी) अनिता विजय शिरसाठ (280) असे उमेदवार विजयी झाले असून निवडणूक चुरसपूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश अनारसे यांनी काम पाहिले तर त्यांना मच्छिंद्र रहाणे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com