लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील कोल्हार या ठिकाणी काल सुपारी, हिरा पान मसाला, गुटखा, सुंगंधी सुपारी विक्रीसाठी वाहतुकीस बंदी असतानाही

अन्न सुरक्षा व अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी कोल्हार येथील दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हार येथे काल अन्नसुरक्षा व अन्नप्रशासन विभागाचे अधिकारी राजेश नामदेव बढे व त्यांच्या सहकार्यांनी छापा टाकून 52 पॅकेट सुपारी, 6 पॅकेट हिरा पानमसाला, 9 पॅकेट तंबाखू असा माल पकडला. आरोपी शेख व तांबोळी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा पानमसाला सुगंधी सुपारी व तत्सम अन्नपदार्थ विक्री साठा उत्पादन वाहतुकीस बंदी घातली आहे.

सदर अन्नपदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहे तसेच त्याच्या सेवनापासून वेगवेगळ्याप्रकारचे गंभीर आजार उद्भवतात व त्यामुळे शरीरास हानी पोहोचते हे )माहीत असतानाही आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधीत अन्नपदार्थाची विक्रीसाठी साठा करुन ते त्यांच्या कब्जात बाळगताना मिळून आले.

याप्रकरणी राजेश बढे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी हर्षद अनिस शेख, रा. आत्तार गल्ली, कोल्हार ब. नदीम शौकत तांबोळी, रा. आत्तार गल्ली, कोल्हार यांच्याविरुद्ध लोणी पोलिसात अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याखालील नियम व नियमने 2011 चे कलम 26 ( 2) (4) 27 (3) (डी) 27 (3) (इ) 30 (2) (अ) 3 (1) (झेड झेड) 188, 272, 273 प्रमाणे गुरनं. 122 दाखल करण्यात आला. याप्रकरणी सपोनि समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. लबडे हे करीत आहेत.