वयोवृद्ध महिलांचा अनोखा उपक्रम

वयोवृद्ध महिलांचा अनोखा उपक्रम

कोल्हार | वार्ताहर

नवरात्र उत्सव काळात कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीमाता मंदिरात आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. गर्दीमुळे मंदिर परिसरात अवतीभोवती कचरा झाला असेल. तो स्वच्छ करून एकप्रकारे देवीच्या चरणी सेवा रुजू होईल.

या संकल्पनेतून येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी महिला हरिपाठ ग्रुपने पुढाकार घेतला. हाती झाडू घेत प्रांगण स्वच्छ केले. विशेष बाब म्हणजे यामध्ये निम्म्याहून अधिक महिलांनी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे.

कोल्हार भगवतीपूर येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी महिला हरिपाठ ग्रुप सातत्याने धार्मिक कार्यात सहभागी असतो. या ग्रुपच्या महिला पन्नाशीच्या पुढच्या तर काही महिलांनी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे. अनेक वर्षांपासून येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात सायंकाळच्या सुमारास नित्यनेमाने त्यांच्याकडून हरिपाठ तथा भजन केले जाते. याखेरीज विशेष सणवारांना भजन करतात.

नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरात कचरा झाला असेल, तो स्वच्छ करण्याची जबाबदारी आपलीदेखील आहे. आपले सामाजिक उत्तरदायित्व निभवावे या उद्देशाने या सर्व महिलांनी देवी मंदिराचा परिसर स्वच्छ केला. वयोवृध्द महिलांनी राबविलेला हा उपक्रम तरुणांसाठी आदर्शवत ठरला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com