कोल्हार भगवतीपूरमध्ये अभिलेख गहाळ

गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, अभिलेखापाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
कोल्हार भगवतीपूरमध्ये अभिलेख गहाळ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील भगवतीपूर ग्रामपंचायतीच्या ताब्यातील अभिलेख गहाळ झाल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यासह ग्रामसेवक, अभिलेखापाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह.

राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायत कार्यालयात दिगंबर हरिभाऊ कोते यांनी 4 ऑगस्ट 1971 ते 21 एप्रिल 2016 या कालावधीतील ग्रामपंचायत कोल्हार भगवतीपूर यांच्याकडे नोंदीत असलेली ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक 269 बाबतचे अज्ञान पालन करता म्हणून नोंदणी व्हावी म्हणून जो अर्ज देण्यात आला आहे. त्या 24 ऑगस्ट 1971 च्या दिलेल्या अर्जाची प्रत साक्षांकित करुन मागितली असता त्या अर्जाची प्रत हा अभिलेख गहाळ केलेला आहे. त्यास कोल्हार भगवतीपूरचे ग्रामसेवक श्रीराम गहिनीनाथ कोते, (रा. वाकडी, ता. राहाता), ग्रामपंचायत कार्यालय कोल्हार भगवतीपूरचे अभिलेखापाल, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शंकरराव शेवाळे जबाबदार असून त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दिगंबर हरिभाऊ कोते (रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 340/2021 प्रमाणे श्रीराम गहिनाथ कोते (ग्रामसेवक भगवतीपूर) रा. वाकडी ता. राहाता, अभिलेखपाल (रेकॉर्ड किपर) ग्रामपंचायत कार्यालय भगवतीपूर, ता. राहाता, समर्थ शंकरराव शेवाळे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती राहाता) यांच्या विरुध्द महाराष्ट्र अभिलेख 2005 वे कलम 9 व भादवि 175,188, 217, 218 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे ठिकाण लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने राहाता पोलिसांनी हा गुन्हा लोणी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Related Stories

No stories found.