कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या नवीन विश्वस्तांची नियुक्ती

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या नवीन विश्वस्तांची नियुक्ती

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित वस्तीस्थान असलेल्या कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या 15 सदस्यीय नवीन विश्वस्त मंडळाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर येथील धर्मादाय उपआयुक्त यु.एस.पाटील यांनी दि. 1 फेब्रुवारीपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नेमणूक केली.

कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामध्ये कोल्हार बुद्रुक येथील 8 सदस्य तर भगवतीपूर गावच्या 7 सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वीच्या विश्वस्त मंडळ कार्यकारिणीचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला. त्याअनुषंगाने धर्मादाय विभागाने नवीन विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण केली.

विश्वस्त पदाकरिता इच्छुकांना पॅनलद्वारे या निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यातून धर्मादाय उपआयुक्त यांनी खालील विश्वस्त मंडळास नियुक्त केले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या निवड प्रक्रियेतून विश्वस्त म्हणून कुणाला संधी मिळते याकडे दोन्हीही गावांतील ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते.

नवनियुक्त विश्वस्त मंडळ

सयाजी रघुनाथ खर्डे (देवालय ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष), विजय माधवराव निबे, लक्ष्मण बाळासाहेब खर्डे, संभाजी रघुनाथ देवकर, संपत विठ्ठल कापसे, सौ.शीतल सुरेंद्र खर्डे, अजित रमेश मोरे, सुजीत लक्ष्मण राऊत (सर्व राहणार कोल्हार बुद्रुक), डॉ. भास्करराव निवृत्ती खर्डे, जनार्दन सर्जेराव खर्डे, चंद्रभान आप्पासाहेब खर्डे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, साहेबराव सखाराम दळे, नानासाहेब दगडू कडसकर, वसंत नानासाहेब खर्डे (सर्व राहणार भगवतीपूर) आदी नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com