कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये निम्म्याहून अधिक महिलाच असणार आहेत.

कोल्हार बुद्रुकमध्ये 17 पैकी 9 जागा तर भगवतीपूरकरिता 15 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज दिसून येईल.

28 ऑगस्ट 2020 रोजी मागील ग्रामपंचायत कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकाच्या हाती दोन्ही गावांचा कारभार सुरू होता.

येथे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 10 हजार 237 मतदार उमेदवारांचे भाग्य ठरवतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड हे काम पाहतील.

कोल्हार बुद्रुकचे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक 1 - जागा तीन - पैकी एक अनुसूचित जाती व्यक्ती, एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग क्रमांक 2 - जागा तीन - पैकी एक अनुसूचित जाती महिला, एक अनुसूचित जमाती महिला, एक सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग क्रमांक 3 - जागा 2 - पैकी एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग क्रमांक 4 - जागा तीन - पैकी एक ओबीसी व्यक्ती, एक अनुसूचित जाती महिला, एक सर्वसाधारण महिला.

प्रभाग क्रमांक 5 - जागा तीन - पैकी एक ओबीसी व्यक्ती, एक सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग क्रमांक 6 - जागा तीन - पैकी एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण व्यक्ती असे आरक्षण आहे.

भगवतीपूर ग्रामपंचायतसाठी एकूण 5 प्रभागात 15 जागांकरिता निवडणूक होणार आहे. येथे 5 हजार 566 मतदार उमेदवारांची निवड करणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी बी. के. धापटकर हे काम पाहतील.

भगवतीपूरचे प्रभाग निहाय आरक्षण- प्रभाग 1 - जागा तीन - पैकी एक सर्वसाधारण व्यक्ती, एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण महिला.प्रभाग क्रमांक 2 - जागा तीन - पैकी एक सर्वसाधारण व्यक्ती, एक सर्वसाधारण महिला, एक ओबीसी महिला.प्रभाग क्रमांक 3 - जागा तीन - पैकी एक सर्वसाधारण व्यक्ती, दोन सर्वसाधारण महिला.प्रभाग क्रमांक 4 - पैकी एक अनुसूचित जमाती व्यक्ती,एक ओबीसी व्यक्ती,एक सर्वसाधारण महिला.प्रभाग क्रमांक 5 - जागा तीन - पैकी एक अनुसूचित जाती व्यक्ती, एक ओबीसी व्यक्ती, एक सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे.