ना. काळे यांच्या पाठपुराव्यातून कोळ नदीवरील बंधारे भरले

ना. काळे यांच्या पाठपुराव्यातून कोळ नदीवरील बंधारे भरले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्याच्या पूर्व भागातील आपेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगाव, तिळवणी, कासली, गोधेगाव, घोयेगाव या भागातील कोळ नदीवरील सर्व बंधारे ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून भरले गेले आहेत. त्यामुळे वरील सर्व गावांतील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

यावर्षी पावसाळ्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काही भागात समाधानकारक पर्जन्यमान असले तरी पूर्व भागातील काही गावात पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात देखील या गावातील कोळ नदीवरील बंधारे भरले गेले नव्हते. याची दखल घेऊन ना. आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता, पालखेड डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता तसेच येवला उपविभाग कार्यालयाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोळ नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावे अशी मागणी करून याबाबत सर्व अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली.

त्या मागणीला सर्व अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालखेडच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोळ नदीवरील सर्व बंधारे भरण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ना. आशुतोष काळे यांचे पोपट भुजाडे, रामभाऊ खिलारी, कृष्णा मलिक, सुनिल मलिक, प्रविण चौधरी, राहुल गायकवाड, अशोक उकिर्डे, भाऊसाहेब उकिर्डे, चंद्रकांत गायके, नानासाहेब गायके, पोपट शिंदे, संदीप शिंदे, अशोक भोकरे, प्रकाश शिंदे, राजू माने, सुदामराव माने, आप्पासाहेब निकम, नानासाहेब निकम, रवींद्र निकम यांनी ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com