कोकमठाणला सोयाबीन शेतीशाळांची सांगता

कोकमठाणला सोयाबीन शेतीशाळांची सांगता

जेऊरकुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोकमठाण येथे कृषी विभागाच्या उपक्रमातून सोयाबीन शेतीशाळा शेतकरी दिन उत्साहात पार पडला. कोकमठाण येथे मुल्यसाखळी योजनेअंतर्गत निर्मला सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून सोयाबीन प्रकल्पाच्या 4 शेतीशाळा सुरू होत्या. त्याची सांगता शेतीदिनाच्या माध्यमातून सर्व शेतीशाळा सभासद शेतकरी एकत्र येऊन झाली. सोयाबीन पीक माती परीक्षणापासून ते काढणी तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.

त्यातून शेतकर्‍यांना जैविक सेंद्रिय शेती याबाबत जागरूकता निर्माण करून खते, औषधे याबाबत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन शिकविले जाते. या कार्यक्रमाबरोबरच रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ प्रामुख्याने हरबरा या विषयावर कृषी अधिकारी विशाल साबदे यांनी मार्गदर्शन केले.तसेच कांदा पिकावर स्वप्निल पाटील यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. सूक्ष्मसिंचन या विषयावर श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कार्यकारी संचालक दिलीप शिंदे उपस्थित होते. तसेच कोकामठाण येथील उपसरपंच दिपक रोहम, प्रगतशील शेतकरी नवनाथ वक्ते, कृषी पर्यवेक्षक संजय घणकुटे तसेच आत्मा अंतर्गत कृषी गटातील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com