
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी (Rahuri) तालुक्यातील चंडकापूर येथील सरस्वती जयवंत जरे या पन्नास वर्षीय महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने दोन भामट्यांनी लुटून (Robbing) नेल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला (Rahuri Police Station) सरस्वती जयवंत जरे यांनी दोन अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, फिर्यादी व साक्षीदार या दोघी आपल्या घरासमोर उभ्या असताना दिनांक 14 फेब्रुवारी रोजी साडेआठ वाजेच्या दरम्यान दोन भामटे दुचाकीवरून आले व त्यांनी या महिलांना चाकूचा धाक (Knife Fear) दाखवून गळ्यातील व कानातील पोत व एक तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटून (Robbing) नेले असून याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला (Rahuri Police Station) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्हाटे हे तपास करीत आहेत.