भाऊ व पुतणीवर चाकुने वार

रेल्वे स्टेशन रस्त्यावरील घटना
भाऊ व पुतणीवर चाकुने वार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरी जाऊन राडा का घातला, अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्यावर भावाने चाकुने वार (Knife Attack) केला. सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या पुतणीवरही चाकुने वार (Knife Attack) करण्यात आला. ही घटना 7 तारेखला रात्री साडेनऊ वाजता रेल्वे स्टेशन रस्त्यावरील (Railway Station Road) शिवनेरी चौकात घडली. विजय शिवराम कांबळे, काजल विजय कांबळे अशी जखमींची नावे आहेत.

भाऊ व पुतणीवर चाकुने वार
कुर्‍हाडीचा धाक दाखवून दागिने व बोकड घेऊन चोरटे पसार

याप्रकरणी विजय कांबळे यांच्या फिर्यादीवरून रमेश शिवराम कांबळे याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की, रमेश याला तू अरणगाव येथील माझ्या घरी जाऊन राडा का घातलास असे विचारले असता, त्याने शिवीगाळ करून पँटच्या खिशातून चाकुसारखे धारदार हत्यार काढून उजव्या हातावर मारले.

भाऊ व पुतणीवर चाकुने वार
एमआयडीसी परिसरात घरफोडी

भांडण सोडविण्यासाठी काजल ही मध्ये आली असता, तिच्याही डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ चाकु सारख्या हत्याराने दुखापत केली. यामध्ये आम्ही दोघे जखमी (Injured) झालो असून जिल्हा रूग्णालयात उपचार करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कोतवाली पोलिस (Kotwali Police) पुढील तपास करीत आहेत.

भाऊ व पुतणीवर चाकुने वार
मालमत्ता व दायित्वासह भिंगारला स्वीकारण्याचा मनपा प्रशासनाचा प्रस्ताव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com