पठारेसह पाचारणेला चार दिवसांची कोठडी

सुडके मळ्यातील चाकू हल्ला प्रकरण
 पठारेसह पाचारणेला चार दिवसांची कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी) - एकावर चाकू हल्ला करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण खंडू पाचारणे यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) हे त्यांच्या घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या विजय पठारे, संतोष नवगिरे, गणेश पठारे, करण पाचारणे यांनी पंडीत यांना मारहाण करत शिवीगाळ केली. तर विजय पठारे याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला होता. यापूर्वी देखील पठारे टोळीने शहरातील बालिकाश्रम रोडवर दोन ठिकाणी दरोडा टाकला होता. यानंतर पठारे व त्याचे साथीदार पसार होते. तोफखाना पोलिसांनी पठारे व पाचारणे यांना सोमवारी पुण्यात अटक केली. तपासी अधिकारी सहायक निरीक्षक मुंढे यांनी त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. चाकू हल्ला प्रकरणी संतोष नवगिरे न्यायालयीन कोठडीत असून गणेश पठारे पसार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com