किसान सभा करणार केंद्र सरकारचा राज्यभर निषेध

किसान सभा करणार केंद्र सरकारचा राज्यभर निषेध

अकोले |प्रतिनिधी| Akole

सोयाबीनचे दर (Soybean prices) 11111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक (Soybean Growers) शेतकरी चिंतेने घेरले गेले आहेत. केंद्र सरकारने (Central Government) हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण (Soybean prices Down) झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने (Kisan Sabha) तीव्र शब्दात निषेध व्यक्त (Protested) केला आहे.

27 सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या (Central Government) निर्णयाचा निषेध (Protested) व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ (Protested) संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची (Kisan Morcha India Close) हाक दिली आहे, त्यास ही कृती पूरकच आहे.शेतकर्‍यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन (Soybean) विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन (Soybean) न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले(Dr. Ajit Navale) आदींनी केले.

Related Stories

No stories found.