किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत

किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत

अकोले |प्रतिनिधी| Akole

अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 रोजी अकोले, जि. अहमदनगर येथे आयोजित केले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर सभेने होणार असून ओल्या दुष्काळ प्रश्नी राज्यव्यापी आरपार लढ्याचे नियोजन अकोले अधिवेशनात करण्यात येणार आहे.

किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत
चक्क! महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणार्‍या बोटी

राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले 300 प्रतिनिधी व किसान सभेचे 71 राज्य कौन्सिल सदस्य तीन दिवसांच्या या अधिवेशनासाठी अकोले येथे उपस्थित राहणार आहेत.

किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत
शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्षांची 3 नोव्हेंबरला निवड

अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकरी व श्रमिकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यव्यापी लढ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे व शेतकर्‍यांना उपजीविकेसाठी सहाय्य म्हणून प्रति एकर 50 हजार रुपये भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई व विमा भरपाई द्यावी, दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, उसाला एफ.आर.पी. अधिक 200 रुपये एकरकमी द्यावेत.

किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोलेत
रद्द झालेल्या झेडपी नोकर भरतीचा नगरकरांनाही फटका!

सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा, दारिद्र्यरेषेच्या यादीत पात्र लाभार्थींचा समावेश व्हावा, वनजमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून हिरड्याला रास्त भाव द्यावा, श्रमिकांना घरकुल, रेशन व वृद्धापकाळ पेन्शन द्यावे, रस्ते, कोरीडॉर, धरणे, रेल्वे, हायवे, विमानतळ आदी विकासकामांसाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकर्‍यांना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई व पुनर्वसन द्यावे, या व इतर मागण्यांसाठी राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी अकोले येथे संपन्न होत असलेल्या या सभेत डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com