दारू विक्रीला विरोध; एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

दारू विक्रीला विरोध; एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्लॉटवर दारू विक्री करण्यास विरोध केला व याबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणातून सहा जणांच्या टोळक्याने गज, लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी नागापूर एमआयडीसीतील तारापान जवळ ही घटना घडली. या मारहाणीत रवींद्र वामन सुपेकर (वय 50 रा. झोपडी कॅन्टींग, नगर) हे जखमी झाले आहेत.

त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम भाकरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागापूर), कुबड्या ऊर्फ दशरथ पालवे (रा. नागापूर) व इतर चार अनोळखी इसमांविरूद्ध खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी फिर्यादी तारापान जवळ असताना तेथे आरोपी आले. फिर्यादी त्यांना म्हणाले, माझ्या प्लॉटमध्ये दारू विक्री का करता.

तसेच अरोपी प्रेम भाकरे याचा मोबाईल नंबर पोलीस ठाण्यात दिल्याचा राग येऊन आरोपी हे फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवे होत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर आरोपींनी फिर्यादीला गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com