10 लाखांसाठी कापड दुकानदारासह कामगारांचे अपहरण
सार्वमत

10 लाखांसाठी कापड दुकानदारासह कामगारांचे अपहरण

शहरात एकच खळबळ

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरातील माध्यवस्ती भागात गांधी पुतळा परिसरात असलेल्या बाल गणेश किड्स वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार रा.समता नगर कोपरगाव व कामगार शाफिक उद्दीन शेख रा. दत्त नगर कोपरगाव याचे अपहरण झाल्याची घटना शनिवार 18 जुलै रोजी रात्री उघडकीस आली आहे.

याबाबत बबनराव बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राजेंद्र कुसुंदल रा. लक्ष्मी नगर कोपरगाव, सचिन संजय साळवे रा. गजानन नगर कोपरगाव, आकाश विजय डाके रा. गोकुळ नगरी कोपरगाव, शुभम केशव रागपसरे रा. कोर्ट रोड कोपरगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गांधी पुतळा परिसरातील बाल गणेश किड्स वेअरचे मालक व दुकानात कामाला असलेल्या कामगाराचे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार एम एच 12 एन बी 2482 या कार मधून वरील आरोपींनी कृष्णा पवार व शाफिक उद्दीन शेख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली व त्यांच्याकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या पथकाने वरील चार आरोपींना सापळा रचत अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आरोपी सचिन राजेंद्र कुसुंदल याने या अगोदरही अनेक बोगस विक्री वाढ योजनांच्या अमिश दाखवून अनेक नागरिकांची लाखो रुपयांची लूट केली आहे. वरील घडलेल्या अपहरणाच्या घटनेबाबत बबन बाळाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे हे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com