तीन अल्पवयीन मुलींचे कोपरगाव तालुक्यातून अपहरण

तीन अल्पवयीन मुलींचे कोपरगाव तालुक्यातून अपहरण

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-

तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव येथून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पालकांच्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपहरणाच्या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.तर दोन मुलींचा तपास गुरुवारी लागला असून एकीचा शोध सुरू पोलीस करत आहे.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, यामध्ये तालुक्यातील बोलकी शिवारातील 16 वर्षे वयाच्या मुलीचे मंगळवारी दि. 4 मे दुपारी 1 वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर दुसर्‍या घटनेत शहाजापूर 14 वर्षे वय असलेल्या मुलीचे बुधवारी दि.5 मे रात्री 2 वाजेच्या सुमारास अपहरण झाले. तर तिसर्‍या घटनेत शिरसगाव येथील 16 वर्ष वय असलेल्या मुलीचे बुधवारी दि. 5 मे सकाळी 6 वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. दरम्यान तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या तीनही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ? याबाबत पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार तपास करीत आहेत.

शिरसगाव येथील मुलगी सावत्र आईच्या जाचाला कंटाळून चुलत मावशीकडे वैजापूर तालुक्यातील एका गावात गेली होती तर बोलकी येथील मुलगी आई रागावल्याच्या कारवणावरून श्रीरामपूर येथे रहिवासी असलेल्या मामाच्या घरी गेली होती. शहजापूर येथील मुलीचा शोध पोलीस घेत या दोन्ही मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com