विवाहित अल्पवयीन मुलीचे बालिकेसह अपहरण

विवाहित अल्पवयीन मुलीचे बालिकेसह अपहरण

जिल्हा रूग्णालयातील घटना: पोलिसांकडून शोध सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a Minor Girl) लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) मुलीची आई, पती व सासर्‍या विरोधात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Crime) झाला आहे. दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीला जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तेथून तिच्यासह तिच्या बालिकेचे अपहरण (Kidnapping) झाले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

नगर शहरात (Nagar City) राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना लग्न लावून दिल्याप्रकरणी कोतवालीत (Kotwali Police Station) गुन्हा दाखल आहे. इच्छा नसतानाही पतीने वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. त्याला जुगाराचा नाद असल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर मला घरी येऊन त्रास देत, माझ्या आईला मारून टाकयची धमकी देत असल्याचे, पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. तिने एका मुलीला जन्म दिला.

यानंतर पिडीताने चाईल्ड लाईनची (Child line) मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला व तिच्या बालिकेला घेऊन जिल्हा रूग्णालयात आले होते. तेथून तिच्यासह बालिकेचे अपहरण झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचारी महिलेने तोफखान्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहे. तिच्या शोधासाठी तोफखाना पोलिसांनी पथके रवाना केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com