श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

अपहरण होऊन तीन दिवस उलटूनही बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण यांचा तपास न लागल्याने भाजपाच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधिक्षक

डॉ. दिपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर तपास न लागल्यास श्रीरामपूर शहर बंद पुकारण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला.

या निवेदनात म्हटले आहे की, गौतम हिरण बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले. अद्याप त्यांचा कुठलाही तपास पोलिसांकडून होताना दिसत नाही. सदर घटनेमुळे तालुक्यातील सर्व व्यापारी व जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. असा अनुचित प्रकार कोणत्याही व्यापार्यासोबत होऊ नये यासाठी पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

या घटनेची गांभिर्याने दखल घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन हिरण यांची लवकरात लवकर सुटका करावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, जिल्हा कार्यकारिणी सदस्या अनिता शर्मा, मिलिंदकुमार साळवे, अरूण धर्माधिकारी, अजित बाबेल, बंडुकुमार शिंदे, आनंद बुधेकर, रूपेश हरकल, अमित मुथ्था, श्रेयस झिरंगे,

डॉ. ललित सावज, रवी पंडीत, उज्ज्वल कुमार डाकले, इंजि. चंद्रकांत परदेशी, महावीर पाटणी, दिपक सिंघवी, निलेश कटारिया, सुविध गांधी, रोहीत भंडारी, अक्षय कटारिया, अजिंक्य राका, प्रवीण लुक्कड, पंकज करमासे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.