अपहरण करून खून ; प्रेत जंगलात फेकले

आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी
अपहरण करून खून ; प्रेत जंगलात फेकले

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) / Kopargaon - तालुक्यातील कासली येथील महेश सोन्याबापू मलिक याचे चेतन बापू आसने व केशव बापू आसने या अपहरण (kidnapping) करून त्याचा कुर्‍हाडीने खून (murder) केला व त्याचे प्रेत हरसुल तालुका त्र्यंबकच्या जंगलात फेकून दिले होते. पोलिसांनी 48 तासाच्या आत आरोपींना पकडून मृतदेह ताब्यात घेतला. दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

मयत महेश मलिक व त्याचा ट्रॅक्टर चालक यांच्यात काही दिवसापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण झाले होते.त्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक चेतन आसने हा नाशिक कडे फरार झाला होता.मात्र तो गुरूवारी (1 जुलै) रोजी घरी आल्याची पक्की खबर मिळाल्याने महेश जाब विचारण्यासाठी पढेगाव येथे चेतनच्या घरी गेला असता आरोपी चेतन बापू आसने व केशव बापू आसने यांनी त्याचे अपहरण करून त्याला पिक अप मधुन जीवे मारण्याचे इराद्याने घेऊन गेले होते, तपास कोपरगाव तालुका पोलिसांना दोघे आरोपी निफाड तालुक्यातील आपल्या नातेवाईकाकडे येणार असल्याची खबर मिळाली.

त्यामुळे कोपरगाव पोलिसांनी दोन जुलै मध्यरात्रीच्या वेळेस चांदोरी टाकळी फाटा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे नातेवाईकाच्या घरासमोर सापळा लावला होता परंतु आरोपींना चाहूल लागल्याने ते वाहनासह पळून जात असताना पोलिसांनी मोठ्या धाडसाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या महेश मलिक याचा कुर्‍हाडीचा घाव घालून खून केला. व त्याचा मृतदेह कायरीची बारी, कचरपाडा शिवार, गावठा रोड, हरसुल तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक जंगलात फेकून दिल्याची माहिती दिली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com