दोन दुचाकींच्या धडकेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

खुपटी- नेवासा रस्त्यावरील घटना || दुसर्‍या जखमीवर उपचार सुरु || एकावर गुन्हा दाखल
अपघात
अपघात

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

दुचाकीवरुन जात असलेल्या वडिलांना धडक देऊन वडिलांचे मरणास तसेच पुतण्याचे कमी-अधिक गंभीर दुखापती कारणीभूत ठरला म्हणून मुलाने दिलेल्या फिर्यादिवरुन पसार झालेल्या दुसर्‍या दुचाकीस्वाराविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन शंकर कुलट (वय 36) धंदा-नोकरी मूळ रा. वळण ता. राहुरी, हल्ली रा. परळ, मुंबई याने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझे वडील शंकर काशिनाथ कुलट (वय 71) रा. वळण ता. राहुरी व माझा पुतण्या सत्यम सोमनाथ कुलट हे दि.16 एप्रिल रोजी त्यांचेकडील बजाज प्लॅटिना दुचाकी (एमएच 17 सीएच 1990) वरुन माझ्या बहीणीकडे देवगड येथे जाण्यासाठी खुपटी-नेवासा रोडने निघाले होते.

दुपारी एक वाजेची सुमारास मला फोन आला की तुमचे वडील व पुतण्या हे नवाशाकडे जात असताना समोरून येणारे दुचाकीने त्यांना जोराची धडक झाल्याने त्यांचा खुपटी ते नेवासा जाणारे रोडवर अपघात झाला आहे. तेव्हा मी व इतर काही लोक सदर ठिकाणी आलो असता माझ्या वडीलांकडील दुचाकी व धडक देणारी दुचाकी एमएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल (एमएच 20 एफएक्स 5056) या शेजारी शेजारीच पडलेल्या होत्या. तेव्हा तिथे आले नंतर आम्हाला समजले की त्यांना श्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नेवासा फाटा येथे उपचाराकामी दाखल केले आहे तसेच सदर अपघातात दुचाकी नंबर एमएस 20 एफएक्स 5056 वरील चालक त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता पळून गेला आहे.

सदर ठिकाणी गेलो असता पाहिले की माझे वडिलांचे डोक्याला जबर मुका मार लागलेला होता तसेच माझा पुतण्या सत्यम याचे डोक्याला, डोळ्याला, छातीला देखील मार लागला होता तसेच नाकाच्या हाडाला जबर मार लागला लागून जखमी झालेला होता. वडिलांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल केले. दि.24 एप्रिल रोजी पहाटे वडिलांची प्रकृती अधिक खालावून ते मयत झाले. माझा पुतण्या सत्यम याचेवर श्री हॉस्पिटल नेवासा फाटा येथे औषधोपचार चालू आहे.

माझे मयत वडील यांचे मरणास तसेच माझा पुतण्या सत्यम याचे कमी-अधिक गंभीर दुखापती तसेच त्याचेकडील दुचाकी हिचे नुकसानीस दुचाकी नंबर एमएच 20 एफएक्स 5056 तिच्यावरील चालक हाच जबाबदार आहे. तो सदर अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून माझी त्याचे विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी वरील क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकावर अपघात तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com