खुडसरगाव परिसरात विवाहित महिलेवर अत्याचार

वांजुळपोईच्या आरोपीविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
खुडसरगाव परिसरात विवाहित महिलेवर अत्याचार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मी किती दिवसांपासून तुझ्यामागे फिरतोय. पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही. असे म्हणत 30 वर्षीय विवाहित महिलेला उसात ओढून नेले. नंतर विळ्याने तिचा गळा कापण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील खुडसरगाव शिवारात दि. 6 मे रोजी घडली आहे.

या घटनेतील 30 वर्षीय महिला ही राहुरी तालुक्यातील वांजुळपोई परिसरातील असून सध्या ती तिच्या कुटुंबासह माहेगाव परिसरात रहावयास आहे. दि. 6 मे रोजी ती महिला व इतर दोन महिला खुडसरगाव शिवारातील शेतात गवत खुरपत होत्या. त्यावेळी पीडित महिला शेताच्या एका बाजूला तर इतर दोन महिला शेताच्या दुसर्‍या बाजूला गवत खुरपत होत्या. दुपारी दोन वाजे दरम्यान आरोपी नवनाथ जाधव हा तेथे आला.

पीडित महिलेला म्हणाला, मी किती दिवसांपासून तुझ्यामागे फिरतोय. पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही. असे म्हणून त्याने त्या महिलेला उसात ओढून नेले. तेव्हा त्या महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिच्या हातातील विळा घेऊन तिच्या गळ्यावर लावला. नंतर त्याने गळा कापण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केला. त्यावेळी पीडित महिलेचा पती त्या ठिकाणी येत असल्याचे पाहून आरोपी नवनाथ जाधव हा घटनास्थळावरून पसार झाला.

पीडित महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी नवनाथ भाऊसाहेब जाधव रा. वांजुळपोई ता. राहुरी याच्या विरोधात शारिरीक अत्याचार व मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.