खोकर येथील शेतकर्‍याच्या पोटात विष गेल्याने उपचारासाठी दाखल

पोटात विष गेले की स्वत: घेतले याबाबत पोलिसांचा तपास सुरू
खोकर येथील शेतकर्‍याच्या पोटात विष गेल्याने उपचारासाठी दाखल

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील एका शेतकर्‍याच्या पोटात विष गेल्याने त्यास उपचाराकरीता श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेस दोन दिवस झाले असून संबधीत शेतकरी अत्यवस्थ असून त्याचे पोटात विषारी औषध कसे गेले हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. सावकारकीच्या कारणावरुन त्याने विष घेतले असावे अशी चर्चा गावात सुरु होती.

खोकर येथे राहत असलेला शेतकरी बाबासाहेब गंगाधर कुसेकर यांचे पोटात मंगळवार दि.5 जुलैच्या दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांनी आपले सहकारी भाजपाचे शेतकरी युवा मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पटारे व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी दोंड यांचेशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता पटारे व दोंड यांचेसह बंडू जगताप यांनी लागलीच कुसेकर यांना उपचारासाठी साखर कामगार हॉस्पीटल येथे दाखल केले.

ही घटना श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील एका दुकानासमोर घडल्याने या शेतकर्‍याच्या पोटात विष कसे गेले? नजर चुकीने पोटात विष गेले? की त्यांनी स्वत:च विष घेतले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जर कुसेकर यांनी स्वत:च विष घेतले असेल तर त्याचे कारण काय? याबाबत कुठलीही माहीती उपलब्ध होवू शकली नाही. याबाबत तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता श्री.कुसेकर यांची प्रकृती नाजूक आहे, ते सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. त्याचं जबाबानंतर काय ते स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान कुसेकर यांचे अनेकांशी आर्थिक व्यवहार होते, त्यास सावकारकी सारखा प्रकार असु शकतो अशी चर्चा सुरू असल्याने त्यांचे जबाबनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com