खेर्डी चिपळूण पूरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मदत साहित्याचे वाटप

खेर्डी चिपळूण पूरग्रस्तांना संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मदत साहित्याचे वाटप

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

चिपळूण तालुक्यातील खेर्डी पुरग्रस्तांवर कोसळलेले दुःख हलके करण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संजीवनी युवा सेवकांनी केले. पुरग्रस्तांच्या थेट घरोघर जात मदत साहित्याचे वाटप केले. या भागात साथीचे आजार पसरू नये यासाठी स्वच्छता अभियान राबवत फॉगींग मशिनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी केली.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव तालुकावासियांना पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते त्याप्रमाणे विविध खाद्यपदार्थ, अंथरूण, पांघरूण, पुरूष, महिला भगिनींसाठी कपडे, लहान मुलांना स्वेटर, टी शर्ट स्वच्छ, पिण्याचे पाणी आदी दोन ट्रक मदत साहित्य घेऊन विवेक कोल्हे व त्यांचे 50 संजीवनी युवा सेवक मदत कार्यात सहभागी झाले होते. खेर्डी चिपळूण भागात विवेक कोल्हे यांनी श्रमदान केले. चिखलात घरोघर जात पुरग्रस्त कुटुंबांना आधार दिला. पाऊस सुरू असतानाही थेट मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविली त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. या भागात पुराचा तडाखा मोठा होता, अनेक रहिवासीयांच्या घरात पाणी घुसल्याने अबाल वृध्दांचे हाल झाले.

त्यांना वैद्यकिय सेवाही मिळणे दुरापास्त होते. त्यासाठी सोबत नेलेल्या वैद्यकीय पथकाद्वारे सेवा दिली. चिखलाची दलदल, सतत सुरू असलेला पाउस, शेकडो किलोमिटर दूर जाऊन केलेले कार्य खेर्डी चिपळूणवासियांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे कोकण विभाग संपर्क प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मदतकार्याची समक्ष पाहणी केली. घरोघर मदतकार्य वाटप होत असल्याने विवेक कोल्हे व त्यांच्या संपूर्ण मदत पथकाचे कौतुक केले.

या संकट काळात प्रत्यक्ष घटनास्थळी येत धीर दिल्याने सर्वत्र संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव वासियांच्या मदत कार्याची चर्चा करत सरपंच सौ.वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, विजय दाते, ग्रामपंचायत सदस्य विनोद भूरण त्यांचे सर्व सहकारी, ग्रामविस्तार अधिकारी अनिल शिंदे, खेर्डी ग्रामस्थ आदींनी आभार मानले. या सेवाकार्यात उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, रवि रोहमारे, नाटेगावचे सरपंच विकास मोरे, वारीचे उपसरपंच विशाल गोर्डे, युवासेवक सिध्दार्थ साठे, रोहित कणगरे यांच्यासह 50 युवासेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com