गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील मुळा नदी काठी वसलेल्या खेडले परमानंद गावातील किल्ला स्वरूप मठाकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित पणामुळे हा मठ अखेरची घटका मोजताना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सप्रमाण असलेला शिवभारत हा ग्रंथ कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला आहे. इतिहासात त्यांना नेवासकर या नावाने संबोधले जाते खेडले परमानंद तालुका नेवासा या ठिकाणी छत्रपतींनी दिलेली सनद व किल्लास्वरूप मठ असून पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे खूप पडझड झालेली आहे.

कवींद्र परमानंद म्हणजेच परमानंद स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीच्या वेळेस सोबत होते असाही उल्लेख इतिहासामध्ये आढळून आलेला दिसतो. निजामशाहीचा अहमदनगर जिल्ह्यात पगडा असल्याकारणाने शिवशाहीतील गुप्तता, हा संदर्भ देऊन हे ठिकाण पुरातत्व खाते व इतिहासापासून वंचित राहिलेले दिसते.

परमानंद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्याला खुश होऊन त्यांना मठ व 580 एकर जमीन सनद म्हणून दिलेली होती. तरी पुरातत्व खात्याने याची दखल घेऊन या छत्रपतींचा वारसा लाभलेल्या या मठाचा जिर्णोध्दार करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.