खरीपासाठी 37 हजार व्किंटल बियाणांचा पुरवठा

हंगामाची तयारी : शेतकर्‍यांनी गर्दी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
खरीपासाठी 37 हजार व्किंटल बियाणांचा पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अनेक ठिकाणी कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली असून जिल्ह्यात सध्या उडिद पिकाच्या बियाण्याला मोठी मागणी आहे. काही तालुक्यात तर या पिकाचे बियाणे पोलीस बंदोबस्तात विक्री करण्याची वेळ आली आहे.

नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मान्सूनपूर्व पावसाने साथ दिल्यास जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पिक अधिक घेण्यात येते. तर मान्सून दाखल झाल्यावर जिल्ह्यात होणार्‍या भिज पावसावर बाजार, सोयाबिन आणि पिकांची पेरणी होते. पाटपाण्यासह विहीर बागायात असणार्‍या भागात कपाशीच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र दरवर्षी वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणी नूसार बियाणे आणि खतांचा पुरवठा होत असून सध्या बाजारपेठे मागणीच्या तुलनेत 70 टक्क्यांच्या जवळपास बियाणांचा पुरवठा झालेला आहे.

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर खर्‍याअर्थाने पेरण्यांना सुरूवात होणार आहे. त्यावेळी सोयाबीन, बाजारी, तूर, मका या पिकांची मागणी राहणार असून मान्सूनमध्ये दमदार पाऊस झाल्यास कपाशीच्या बियाणांची मागणी वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने पहिल्या टप्प्यात 3 लाख 50 कपाशी बियाण्यांच्या पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात बियाण्यांची टंचाई होणार नाही. मागणीनूसार तातडीने सर्व पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी करून नयेत, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी केले आहे.

असा आहे पुरवठा (क्विंटलमध्ये)

भात 2 हजार 59, खरीप ज्वारी 13, बाजरी 4 हजार 248, मका 5 हजार 567, तूर 1 हजार 334, मूग 933, उडिद 3 हजार 391, तिळ 200, भुईमूग 300, सुर्यफूल 3, सोयाबिन 17 हजार 595 असे एकूण 37 हजार 154 असा आहे.

एमआरपीपेक्षा वाजवी दराने विक्री

समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी बि-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात जात आहेत. सुरुवातीला दुकानदाराकडून खते, बियाणे शॉर्टेज असल्याचे सांगितले जाते आणि नंतर गिर्‍हाईकाचा अंदाज घेवून दुकारानातील कामगारच बि-बियाणे, खते एमआरपी पेक्षा जास्त पैसे घेवून विकत आहे. घेतलेल्या मालाचे पक्के बिलही दिले जात नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com