चार लाख 40 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण !

चार लाख 40 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण !

सरासरीच्या 98 टक्के पेरा : उडिदाचे क्षेत्र 400 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात (Ahmednagar District) विविध भागात पडणार्‍या पावसामुळे (Rain) खरीप हंगामासाठी (Kharif season) सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात 4 लाख 40 हजार हेक्टर पेरणीचे क्षेत्र (Sowing area) असून झालेल्या पेरण्यामध्ये उडिद पिकाची (urad crop) 72 हजार हेक्टरवर पेरणी झालेली असून सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 400 टक्के आहे.

जुलै महिन्यांतील 20 दिवस संपले आहेत. यंदा सुरूवातीच्या पावसानंतर जून महिन्यात मोठा खंड पडल्याने पहिल्या टप्प्यात झालेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागात झालेल्या दमदार पावसाने त्या पिकांना जीवदान मिळण्यासोबतच पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदाच्या पेरण्यांमध्ये कृषी विभागाने केलेल्या सरासरी क्षेत्राच्या नियोजनात उडिद, सोयाबीन ( Soybeans), मूग (Moog), मका पिकांचे (maize crops) क्षेत्र दुप्पट ते चारपट वाढलेले आहे. तर बाजरी पिकांची पेरणी (Sowing of millet crops) सध्या 50 ते 55 टक्केच आहे.

कृषी विभागाच्या (Department of Agriculture) माहितीनुसार जिल्ह्यात पेरण्या झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असून कोणत्याही पिकावर किड रोगाचा प्रादूर्भाव नसल्याचे सांगण्यात आले. नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा असून सुरूवातीच्या पावसावर खरीप हंगामाची मदार असते. मात्र, काही वर्षात सुरूवाला चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील खरीपाचे नियोजननूसारच्या सरासरी क्षेत्र वाढत आढतांना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या 4 लाख 40 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून उस, कांदा लागवडी, फळबागा, भाजीपाला पिकांसह हे क्षेत्र 5 लाख 50 हजारांपर्यंत पोहचले आहे.

झालेली पेरणी

भात सुमारे 2 हजार हेक्टर (20 टक्के), मका 36 हजार 262 (111 टक्के), तूर 44 हजार 284 (292 टक्के), मूग 44 हजार 181 (109 टक्के), उडिद 72 हजार (400 टक्के), भुईमूग 4 हजार 679 (62.97 टक्के), सोयाबीन 72 हजार (112 टक्के), कापूस 89 हजार 571 (78.33 टक्के) असे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com