खरीप हंगामाचे चांगले नियोजन करा - ना. तनपुरे

राहुरीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
खरीप हंगामाचे चांगले नियोजन करा - ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

येत्या खरीप हंगामात (Kharif Season) शेतकर्‍यांना वेळेवर खते (Fertilizers), बी- बियाणे (Seeds) उपलब्ध होण्यासाठी कृषी खात्याने नियोजन करून शेतकर्‍यांची बियाणे (Seeds) खरेदीत फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांनी केले.

खरीप हंगामाचे चांगले नियोजन करा - ना. तनपुरे
मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचं कारस्थान?

राहुरी पंचायत समितीच्या (Rahuri Panchayat Samiti) डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakt Tanpure) हे राहुरी (Rahuri), नगर (Nagar), पाथर्डी (Pathardi) मतदारसंघाच्या खरीप हंगामपूर्व (Kharif Season) आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, श्रीरामपूर कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विलास नलगे, राहुरीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, राहुरीचे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नगरचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे, महावितरणचे योगेश गावले, तालुका विकास अधिकारी एम. डी. तनपुरे आदी उपस्थित होते.

खरीप हंगामाचे चांगले नियोजन करा - ना. तनपुरे
श्रीरामपूरच्या राजकारणात रस नाही

उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र ठोकळे यांनी राहुरी तालुक्याची माहिती सादर केली. यात पर्जन्यमान, मागील वर्षात झालेली पीक उत्पादकता तसेच सन 2021-22 खरीप हंगाम करीता नियोजित पीक व अपेक्षित उत्पादकताबाबत चर्चा झाली. खते, बियाणे औषधे यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेऊन खते, औषधे यासोबत कोणतेही लिंकिंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना दिली.

खरीप हंगामाचे चांगले नियोजन करा - ना. तनपुरे
आवाज उठविल्याने जप्तीची कारवाई - धुमाळ

नगर तालुका कृषी अधिकारी पोपट नवले यांनी सादरीकरण केले. त्यांनी नगर तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामपूर्ण नियोजन सादर केले. कृषी अधिकारी पाथर्डी सुधीर शिंदे यांनी पाथर्डी तालुक्याचे खरीप हंगाम पूर्वनियोजन सादरीकरण केले. त्यात शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, अडवणूक होणार नाही, याबाबत कृषीसेवा केंद्र चालकांना सूचना करण्याचे आवाहन केले. जे व्यावसायिक नियमाप्रमाणे वागत नसल्यास कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच राहुरी, नगर व पाथर्डी तालुका खरीपाचे नियोजन पूर्ण झालेले असून कुठल्याही प्रकारची खते, बी- बियाणे किंवा औषधे यांची कमतरता भासणार नाही. याची ग्वाही दिली. आभार गोरखनाथ खळेकर यांनी मानले. सूत्रसंचालन संचालक चंद्रकांत म्हसे कृषी सहायक यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com