मुळाधरणाच्या उजव्या-डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू

File Photo
File Photo

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या (Mula Dam) डाव्या व उजव्या कालव्यातून (Left and Right Canals) शेतीसाठी आवर्तन (Rotation) सोडण्यात आले आहे. मुळा धरणात (Mula Dam) यंदाच्या हंगामात 7 हजार दशलक्ष घनफूटपेक्षा अधिक पाणी शिल्लक राहणार आहे. त्याचा वापर खरीप दिली. हंगामाच्या पिकासाठी (Kharif Crops) करता येणार असल्याची माहिती मुळाधरण शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे.

File Photo
सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला

धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली. मात्र पडलेला पाऊस जमिनीत जिरल्यामुळे पाण्याची आवक शून्य आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले धरण सलग चार वर्ष पूर्ण क्षमतेने भरले. यंदा धरणात 50 हजार 1999 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची नोंद झाली होती. त्यापैकी 28 हजार द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला (Jayakwadi) सोडण्यात आले. डिग्रस, मानोरी, मांजरी, वाजुंळपोही या बंधार्‍यातही पाणी सोडण्यात आले.

File Photo
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

शेतकर्‍यांच्या मागण्यानुसार मुळा उजव्या कालव्यातून (Mula Right Canal)आत्तापर्यंत 8 हजार 385 द.ल.घ.फू पाणी खर्च झाले आहे. तर डाव्या कालव्यातून शेतीसाठी 1 हजार 53 द.ल.घ.फू पाणी खर्च झाले आहे. दोन्ही कालव्यातून सध्या आवर्तन (Rotation) सुरू असून मुळा धरणात (Mula Dam) सध्या 15 हजार 372 पाणी शिल्लक आहे. यापैकी यंदाच्या हंगामासाठी 8 हजार द.ल.घ.फु. पाणीसाठ्याचा वापर होऊ शकतो. याशिवाय 4 हजार 500 मृत पाणीसाठा आहे.

File Photo
प्राध्यापकांसाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण, शासन अध्यादेश जारी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com