खर्ड्यातील शेतकर्‍याचे उपोषण मागे

छत्रपती शिक्षण मंडळ अतिक्रमाणाची होणार चौकशी
खर्ड्यातील शेतकर्‍याचे उपोषण मागे

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्रीराम बागडे यांच्या मालकीच्या जागेवर श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाने केलेले अतिक्रमण व फसवणुकीबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक मेघशाम डांगे यांनी जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिल्यानंतर श्रीराम बागडे व गौरव बागडे यांनी नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी व जेष्ठ पत्रकार श्रीराम पांडुरंग बागडे व त्यांचा मुलगा गौरव श्रीराम बागडे यांनी आपल्या खर्डा येथील मालकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण व शासनाच्या फसवणुकी बाबत दाद मागण्यासाठी येथील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर बुधवारी सकाळी 11 वा. उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेऊन श्रीराम बागडे व गौरव बागडे यांच्याशी गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक मेघशाम डांगे यांनी चर्चा केली. व हा विषय समजावून घेतला. त्यानंतर वरील प्रमाणे आदेश दिले.

बागडे यांची खर्डा येथे गट नं. 361 मध्ये 2 हेक्टर 27 आर मालकी हक्काची जमीन आहे. या जमिनीवर श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाने खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून बागडे यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले.

संस्थेचे सचिव महेश निवृत्ती गोलेकर व त्यांचे नातेवाईक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थेसाठी मंजुरी घेतली. व त्या जागेवर 2002 साली विद्यालयाची उभारणी केली. याबाबत बागडे यांनी जामखेड येथील स्थानिक पोलीस व महसूल प्रशासन यांच्याकडेही लोकशाही मार्गाने दाद मागितली. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी बुधवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले सुरू केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com