
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील खांडगाव येथे मंगळवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन कुटुंबांत जागेच्या वादातून हाणामारी होऊन संगमनेर शहर पोलिसांत तब्बल 27 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खांडगाव येथील राजेंद्र यादव सस्कर हे गावी गेलेले असताना शेजारील जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन सूर्यभान गुंजाळ, अजित बाबासाहेब गुंजाळ, महेश नामदेव गुंजाळ, अमित बाबासाहेब गुंजाळ व इतर चार ते पाच महिला यांनी जमाव गोळा करून सस्कर यांच्या घराशेजारील हेअर सलून दुकानाचे नुकसान केले.
तसेच बदामाचे झाड तोडले, शौचालयाच्या नळ जोडणीचीही तोडफोड केली. याशिवाय शिवीगाळ करून हातपाय तोडू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत राजेंद्र सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पंधरा व इतर चार-पाच महिलांविरोधात गुरनं. 08/2023 भादंवि कलम 143, 147, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. पवार करत आहेत.
तर दुसरी फिर्याद जनार्दन गोविंद गुंजाळ यांनी दिली आहे. जनार्दन गुंजाळ हे घराजवळ साफसफाई करत असताना राजेंद्र यादव सस्कर, संजय यादव सस्कर, सुभाष यादव सस्कर, प्रसाद संजय सस्कर, पुष्पा कमळाकर सस्कर, सुषमा राजेंद्र सस्कर, सुधाकर यादव सस्कर यांचा मुलगा नाव माहीत नाही यांनी जमाव गोळा करून जनार्दन गुंजाळ यांची भावजय ज्योती संजय गुंजाळ व इतर सुना यांना म्हणाले, ही जागा आमची आहे.
येथे काहीही करायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करुन तुमच्याकडे पाहतो असा दम दिला. यावरून पोलिसांनी वरील सात जणांवर गुरनं. 09/2023 भादंवि कलम 143, 147, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. धादवड करत आहे.