खांडगाव येथे सीईओंचा बळीराजाशी संवाद

एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान
खांडगाव येथे सीईओंचा बळीराजाशी संवाद

करंजी |प्रतिनिधी| Karanji

‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियानाअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी येथील शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी सुरेश पवार, तुकाराम वांढेकर यांच्यासह इतर काही शेतकर्‍यांच्या फळबागांची पाहणी या अधिकार्‍यांनी केली व शेतकर्‍यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. यावेळी कृषी विभागाचे शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी कापसे, जिल्हा कृषी अधिकारी तागड, गटविकास अधिकारी जगदीश पालवे, एकात्मिक बालविकासचे दराडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विष्णू पालवे, संजय कराळे, मगर यांच्यासह कृषी सहाय्यक गुंड, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, घुगरे, शेतकरी अनिल दानवे, बाबुराव गायकवाड, सुभाष गायकवाड, रमेश वांढेकर, संभाजी पवार, आदी शेतकरी उपस्थित होते.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात फळबाग असून या फळबागा संबंधी उपस्थित अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित अधिकार्‍यांचे ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com