खंडाळ्यातील इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

खंडाळ्यातील इसमाची रेल्वेखाली आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) खंडाळा (Khandala) येथील एका इसमाने रेल्वेखाली (Railway) येवून आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खंडाळा (Khandala) येथील कारभारी रभाजी अभंग (वय 59) यांनी काल सूतगिरणी धनगरवाडी (Dhangarwadi) दरम्यान रेल्वेखाली (Railway) येवून आत्महत्या (Suicide) केली. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना (Railway Police) कळताच त्यानी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. सुरवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नंतर मृतदेहाची ओळख पटली. सदरचा इसम खंडाळा (Khandala) येथील असून त्याचे नाव कारभारी राभाजी अभंग असे असून त्यांना दोन मुले आहेत.

कारभारी अभंग यांनी आत्महत्या (Suicide) का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com