खंडाळ्यात उसाच्या फडात आढळले बिबट्याचे बछडे

File Photo
File Photo

खंडाळा |वार्ताहर|Khandala

उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणीला प्रारंभ झाला आहे काल एका उस क्षेत्रात उसतोडणी सुरु असताना बिबट्याचे बछडे आढळले.

खंडाळ्यातील शेतकरी राधाकिसन ढोकचौळे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असताना काल दुपारी उस तोडणी मजूराला बछडे आढळले. आसपास बिबट्या किंवा त्याची मादी असेल या भितीने मजूर घाबरून पळाला. शेजारीच निळवंडे धरणाच्या कालव्याचे खोदकाम सुरु असल्याने तेथील कामगाराने त्या बछड्याचा फोटो काढला. तोडणी मजूराने उस मालकाला याबाबतचा निरोप दिला परंतु ते येण्याआगोदर बछडे उसात निघून गेले. बिबटे त्या भागात आहेत हे सर्वांना माहीत आहे. वनविभागाला वारंवार कळविलेले आहे.

चार महिन्यापूर्वी शेतकर्‍यांनी वर्गणी करून पिंजरा आणून त्यात बोकड ठेवला. परंतू तकलादू व नादुरुस्त पिंजर्‍यातून बिबट्याने बोकडाला ओढून फस्त केले. सध्या रब्बी हंगाम सुरु झाला आहे. शेतकर्‍यांची गहू, हरबरा, कांदा लागवडी सुरु झाल्या आहेत. महावितरणकडून सध्या रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत विद्यूत पुरवठा सुरु आहे. त्यामुळे शेतकरी बिबटे आणि रात्री पिकास पाणी देणे या दुहेरी कात्रीत सापडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com