
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील खंडाळा गावात पाटाच्याकडेला पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काहीजण तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून पाच मोटारसायकलसह रोख रकमेसह एकूण 3 लाख 28 हजार 80 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील खंडाळा गावात पाटाच्याकडेला पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काहीजण गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असताना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने छापा टाकुन कारवाई करत जमीर समसुद्दीन शेख (वय 41) रा. खंडाळा, अशोक योशेफ विघावे, (वय 49) रा. खंडाळा, धंनजय अशोक जाधव (वय 38) रा. टिळकनगर, सुरेश शाम त्रिभुवन (वय 59) रा. राजुरी, विठ्ठल यादव ढोकचौळे (वय 54) खंडाळा, सतिश किशोर धिवर (वय 36) श्रीरामपूर, राजू सिताराम पगारे (वय 30) रा. खंडाळा, कृष्णा संजय खरात (वय 25) रा. खंडाळा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जुगार खेळताना जुगाराची साधने व रोख रक्कम तसेच 5 मोटरसायकसह एकुण 3,28,080 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या सर्व आरोपींना ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.