शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

जायकवाडी धरणाच्या पाणी फुगवट्यालगत असलेल्या शेतातील पिके सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे कधी धोक्यात येतील

या भीतीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या परिसरास पूर्ण दाबाने वीज मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथील सब स्टेशनसमोर अर्धनग्न उपोषण करण्यात आले.

एकीकडे पाण्याचा मुबलक साठा आहे; परंतु वीज मंडळाच्या कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे . यामुळे घोटण, खानापूर ,गदेवाडी, कर्हेटाकळी, एरंडगाव या परिसरातील शेतकर्यांच्या रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे.

यामुळे पाण्याची उपलब्धता असताना आणि घोटण व खानापूर स्वतंत्र सबस्टेशन असून देखील शेतकर्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही याची दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला लेखी तक्रार देण्यात आली होती. वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा ,अशी मागणी केली होती.

मात्र संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष व माजी कृषी अधिकारी रावसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली रोजी खानापूर येथील सब स्टेशन समोर अर्धनग्न उपोषण करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण स्थगित केले जाणार नाही अशी शेतकर्यांची भावना होती. उशीरापर्यंत आंदोलन सुरूच होते.

पाणी असून देखील पिकाला पाणी देण्यासाठी लाईट नसल्याने शेतकर्यांसमोर वाढत्या उन्हाच्या तडाख्या बरोबर पिके खाक होण्याची वाट तर प्रशासन पाहत नाही ना असा प्रश्न उपस्थित करून आज आश्वासन दिले आहे . तरीपण जर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर संबंधित शेतकरी केव्हाही पूर्वसूचना न देता मोठे तीव्र आंदोलन करतील असे उपोषणकर्ते रावसाहेब लवांडे यांनी सांगितले.