
दाढ खुर्द |वार्ताहर| Dadh Khurd
संगमनेर तालुक्यातील (Sangamner) खळी (Khali) येथील तलाठी कार्यालयाची (Talathi Office) ‘असून अडचण नसून कोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. गेल्या चार वर्षापासून हे कार्यालय धुळखात पडून आहे. तलाठी कार्यालयात (Talathi Office) पूर्णवेळ कर्मचार्यांची नेमणूक करुन कार्यालय पुर्ववत सुरु करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रयत्नाने लाखो रुपये खर्चून तलाठी कार्यालय व निवासस्थान खळी येथे बांधण्यात आले. मात्र तीन ते चार वर्षापासून या गावाला तलाठी (Talathi) नाही. त्यामुळे तलाठी कार्यालय धुळखात पडून आहे.
सातबारे उतारे, रहिवाशी दाखले, उतार्यावरील नोंदी, फेरफार, विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे या कार्यालयातून मिळतील अशी अपेक्षा असलेल्या ग्रामस्थांची मात्र निराशा झाली आहे. त्यातच तलाठ्याची नेमणूक झाली मात्र त्यांना या कार्यालयात बसण्यास वेळच नाही. तलाठी पिंपरी गावापर्यंत येतात तिथे कुठेतरी गावाच्या कोपर्यामध्ये छोट्याशा ऑफिसमध्ये बसतात, कधी येतात व कधी जातात हे नागरिकांना समजत सुद्धा नाही.
तलाठी व कोतवाल (Kotwal) दोघेही दुसर्या गावांमध्ये बसत असल्याने नागरिकांना त्यांची शासकीय कामे करण्यासाठी पिंपरी (Pimpari) या गावांमध्ये जावे लागते. खळी येथील ट्रॅक्टर चालक व जेसीबी मालक राजरोसपणे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल (Revenue) बुडून अगदी परमिट असल्यासारखे गावातील ट्रॅक्टर (Tractor) व इतर शेजारील गावातील ट्रॅक्टर असे दोघेजण मिळून राजरोसपणे खळी गावातील मुरूम शेजारील गावात व बाहेरील गावांमध्ये मोठ्या पैशाला विक्री करत आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे याकडे दुर्लक्ष (Ignore) झाले आहे.
खळी (Khali) येथील तलाठी कार्यालय तात्काळ सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर खळी येथील बंद पडलेले व अवतीभवती वाढलेली झाडी झुडपे याची साफसफाई अशी मागणी येथील नागरिकांनी संगमनेरच्या (Sangamner) तहसीलदारांकडे केली आहे.
अन्यथा पुढील काळामध्ये येथील नागरिक मोर्चा काढून उपोषण करणार असल्याचा इशारा (Hint) नागरिकांनी दिला आहे.