श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर- पुणतांबा रस्त्यावर खैरीनिमगाव शिवारात सिगारेट विक्री फेरीवाल्याची दुचाकी अडवून त्यास 1 लाख 5 हजारांस लुटले.

रस्तालुटीची ही घटना मंगळवार दि. 16 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास खैरीनिमगाव शिवारातील गितगंगा हॉटेलजवळ घडली.

मगर हे सिगारेट विक्री करून पुणतांब्याहून श्रीरामपूरकडे येत असताना त्यांची हिरो होंडा दुचाकी नं. 2784 ही गाडी चार अज्ञात चोरट्यांनी अडवून गाडीवरील मनोज लक्ष्मण मगर यास चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील रोख रक्कम 50 हजार रुपये व 50000 रुपये किमतीचे सिगारेट, मोबाईल असा एकूण 1 लाख 5796 रुपयांचा ऐवज रस्तालुटीत चोरून नेला आहे.श्रीरामपूर येथील आयटीसी सिगारेट कंपनीचे डिलर डंबीर ऍण्ड सन्स प्रा.लि. या फर्मकडे ते सिगारेट विक्रीचे काम करतात.

रस्तालूट प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गु.र.नं. 0053/2021 भा.दं.वी.कलम 341, 392, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनीही या रस्ता लुटप्रकरणी तातडीने तपासाचे आदेश दिल्यावरून पुढील तपास पोलीस निरीक्षक मसुद खान व पोलीस पथक करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.

डंबीर ऍण्ड सन्स प्रा.लि. या कंपनीच्या सिगारेट विक्रेत्या सन 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर लुटल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास लागलेला नसताना ही दुसरी घटना घडली आहे.