खैरी निमगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार

खैरी निमगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील दत्तात्रय दौंड यांचा कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. येथील दत्तात्रय दौंड यांनी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास बांधलेल्या कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी सोडले आणि काही क्षणात एका बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली. आरडाओरड केल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडून धूम ठोकली. दौंड यांनी कुत्र्याकडे धाव घेत पाहिले परंतु तोपर्यंत कुत्रा मृत झालेला होता. सदर घटना पाहून ते बॅटरी आणण्यासाठी घरात गेले असता बिबट्या त्या कुत्र्याला उचलून काही अंतरावर घेऊन गेला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली.

दरम्यान यानंतर अनिल दौंड, संदीप दौंड यांनी ट्रॅक्टर जोराने रेस करत जवळ असलेल्या गिन्नी गवताच्या आसपास फिरवला. काही दिवसांपुर्वी गावाच्या मध्यवर्ती असलेल्या मन्सुर शेख यांच्या शेतातही बिबट्या आढळला होता. सध्या नवरात्र उत्सवाचा काळ असून येथील वाघाई देवीच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी पहाटेच्यावेळी भाविकांनी मोठी गर्दी असते. चितळी गावातून पायी दर्शनासाठी येणार्‍यांची संख्या मोठी असते. दर्शनासाठी येताना प्रत्येक भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन जागरूक नागरिकांच्यावतीने करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com