खैरी निमगावच्या विस चारीत आढळल्या मृत कोंबड्या

दुर्गंधी आणी कुत्र्यांच्या भितीने शेतीकामाला मजूर मिळेना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

खैरी निमगाव |वार्ताहर|Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील मळीचा ओढा येथे मागील वर्षी ओढ्यातील वाहत्या पाण्यात पोल्ट्री फार्ममधील मृत शेकडो कोंबड्या अज्ञात व्यक्तींकडून फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दोन दिवसांपूर्वी शेकडो मृत कोंबड्या 20 चारीत आणून टाकल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.

गेल्या वर्षी ओढ्यातील वाहत्या पाण्यातील मृत कोंबड्यांमुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले होते. या भागात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाल्याने याबाबत दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी दखल घेत या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. भविष्यात असा प्रकार घडल्यास सर्वच पोल्ट्रीधारकांवर बंदीची कारवाई केली जाईल, असेही सांगितले होते.

मात्र वर्षापुर्वीच्या या घटनेचा विसर पाडून दोन दिवसांपूर्वी पुन्हा शेकडो मृत कोंबड्या 20 चारीत आणून टाकल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीयुक्त कोबंड्या कुत्र्यांनी आसपासच्या शेतकर्‍यांच्या शेतात आणल्या आहेत. त्यांच्या दुर्गंधीमुळे व कुत्र्यांच्या भितीने या ठिकाणच्या शेतात काम करण्यासाठी मजूर धजावत नसल्याने शेतकर्‍यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. अशा प्रकारे इतरत्र मृत कोंबड्या फेकुन देणार्‍या पोल्ट्रीचालकांना यापुर्वीही समज दिली असून मृत कोंबड्या फेकणार्‍या पोल्ट्रीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील संतप्त शेतकर्‍यांनी केली आहे.

निमगाव खैरी कार्यक्षेत्रातील 20 चारी या ठिकाणी शेकडो कोंबड्या आणून टाकल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या मृत कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.

- डॉ. रमेश धापते, वैद्यकीय अधिकारी

20 चारी येथे मृत कोंबड्या टाकण्याचा प्रकार निदंनिय तसेच खेदजनक असून या सदंर्भात ग्रामपंचायतीने त्वरीत पोल्ट्रीधारकांची बैठक घेऊन त्यांना नवीन नियमावली द्यावी, नियम न पाळणार्‍या आणि मृत कोंबड्या फेकणार्‍या पोल्ट्रीधारकांवर बंदीची कारवाई केली जावी.

- अ‍ॅड. दिनेश पुंड, शेतकरी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com